Saturday, May 16, 2020

एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल...... .
आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं आयुष्यात खुप महत्वाचं ठरतं. कारण आपलं सुंदर दिसण हे फक्त समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं, मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हेच त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं.....
✍️an🙏
मी माझ्या हृदया च्या दरवाज्या वर लिहुन ठेवले- ""आत मध्ये प्रवेश करणे मनाई आहे."पण...,प्रेम हसत हसत आत आले आणि म्हणाले,"SORRY, मी तर आंधळे आहे."
असं असत का राव... ❣️
✍️an🙏
कोणतंच नात warranty card घेऊन येत नाही
त्यामुळे बिघडल तर repair करायचं असतं
संपल तर refil करायचं असतं आणि जुनं झालं तर refresh करायचं असतं
कारण नात्यांची मजा हळुवार उलगडण्यातंच असते....
✍️an🙏
ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !
✍️an🙏
असेल अश्रू पुसण्यासाठी कुणीतरी, तर रुसायला बरं वाटतं.
असेल ऐकणारे कुणीतरी, तर मनातलं बोलायला बरं वाटतं.
असेल कौतुक करणार कुणीतरी, तर थकेपर्यंत राबायला बर वाटतं.
असेल नजर काढणारं कुणीतरी, तर नटायला बरं वाटतं.
असेल तुझ्या प्रेमाची साथ तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं...
✍️an🙏❣️

Friday, May 15, 2020

""डोळे" हे तलाव नाहीत, तरीपण भरून येतात...
"अहंकार" हा शरीर नाही, तरीपण घायाळ होतो...
 "दुश्मनी " ही बीज नाही, तरीपण उगवली जाते...
"ओठ " हे कापड नाहीत, तरीपण शिवले् जातात...
"निसर्ग" हा बायको नाही,तरीपण कधीतरी रुसतो...
"बुध्दी" ही लोखंड नाही, तरीपण तिला गंज लागतो...
 "माणूस" हा वातावरण नाही, तरीपण तो बदलला जातो...
कारण परस्थिती नुसार बदलन ही काळाची गरज आहे..
✍️an🙏
- amol m nannaware 
लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून
उपयोग नाही....
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणे हि खुप महत्त्वाचे आहे...!!

 माझ्या मुळे तुम्ही नाही तर
तुमच्या मुळे मी आहे ही वृत्ती
ठेवा बघा किती माणसे जोडली जातात. ..
✍️an🙏
- amol m nannaware 
आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत.....
परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला ""प्रभाव आणि पैसा " नाही
तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात ....
म्हणून ते जपून ठेवा..
✍️an🙏
- amol m nannaware 
मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची. की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं. की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असत...
ते कस जायचं तर...
✍️an🙏
- amol m nannaware 
"" माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचे नसतं...!
तर महत्वाचे असते ते सुंदर आणि निरागस मन,
आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही...!
एकदम या निळ्याशार  आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पाखरांप्रमाणे...!
✍️an🙏
- amol m nannaware 
कुणीही एकटे बोलू शकतं पण गप्पा मारू शकत नाही..
कुणीही एकटे आनंदीत होऊ शकतं पण सण साजरा करू शकत नाही..
कुणीही एकटे हसू शकतं पण हर्षोल्लास करू शकत नाही..
कारण...
आपण सर्व एकमेकांशिवाय काहीही करू शकत नाही...
मला तर वाटतं हिच नात्यातील सुंदरता आहे..
✍️an🙏
- amol m nannaware 
टिपांव तर अचूक टिपावं,नेम तर सारेच धरतात..

शिकावं तर माफ करायला,राग तर सगळेच करतात..!

खळगी भरावी तर उपाशी पोटाची,पोट भरुन तर सारेच जेवतात..

प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष, सुखाचे घोट तर सारेच घेतात..!

जगावं तर इतरांसाठी,
स्वतःसाठी तर सगळेच जगतात...
✍️an🙏
- amol m nannaware

"""कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही..
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही...
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दुःख होता कामा नये""
हीच जीवन जगण्याची खरी रीत आहे..
✍️an🙏
- amol m nannaware 
""सत्य" ही अशी एक श्रीमंती आहे की,
जी एकदाच खर्च करून त्याचा
आयुष्यभर आनंद उपभोगता येतो.
पण "असत्य" हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते...!
✍️an🙏
-amol m nannaware 
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
✍️an🙏
- amol m nannaware 
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी…. व
शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी.
कोणीही जर विनाकारण तुमच्या बद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल , राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत रहा ...
कारण जर जाळण्याकरीता काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझुन जाते.
✍️an🙏
- amol m nannaware 
एका class मध्ये दोन पाखर असतात...
एकाच घर असत शेणाचं तर दुसऱ्याच मेणाचं..
मेणाच्या घरातील पाखराला शेणाच्या घरात संसार थाटायचा असतो..
पन त्या पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेवून भारी..
कधी तरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी...
❣️love is beautiful thing with right person ❣️
✍️an🙏
- amol m nannaware 
*जगात फक्त "हृदयच" आहे. जे,*
*बिना "आराम" करता सतत "काम" करते.म्हणून*
*त्याला "खुश" ठेवा मग ते,*
*"आपले" असो किंवा "दुसर्यांचे​"..*
✍️an🙏
- amol m nannaware 
*एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;*
*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*
✍️an🙏
- amol m nannaware 
घड्याळ जरी सोन्याचं असलं पण त्यामध्ये बॅटरीच नसेल तर त्याची किंमत शुन्यच.. माणूसही कितीही मोठा किंवा श्रीमंत असला पण त्यामध्ये सत्कार्य आणि माणुसकीची उर्जा नसेल तर तो ही शुन्यच..
 जगातील सर्वात लांब आणि
 सुंदर इंग्रजी शब्द म्हणजे
 "SMILES"
 कारण
 पहिल्या "S" पासून
 दुस-या "S" पर्यंत पोहोचायला
 "MILE" लागतात... म्हणून ......नेहमी हसत रहा...
✍️an🙏
- amol m nannaware 
आयुष्य ""एका मिनीटात"
नाही बदलत
ते बदलते..
आपण..त्या एका मिनीटात घेतलेल्या निर्णयावरुन...
✍️an🙏
- amol m nannaware 
आई हि अशी ""बँक" आहे, जेथे
आपण आपली प्रत्येक भावना आणि दुःख जमा करू
शकतो,
आणि
बाबा असे "क्रेडीट कार्ड" आहे,
ज्यांच्याजवळ "बॅलन्स" नसतानाही ते आपले
स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात...!!
✍️an🙏
- amol m nannaware 
कळत न कळत मी पडलो तुझ्या प्रेमात..
एक नवा रंग दिलास मला माझ्या जीवनात..
नदीच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यासारखा सतत येत होता तुझा विचार...
कारण तुला पाहण्याचा झाला होता मला आजार...
तुला पाहिल्याविना दिवस वर्षासारखा वाटत..
अन तुझे एक हसू पाहताच दिवस भुर्रकन उढत..
अनेक दिशेने येत होते माझ्या जीवनात वादळ..
ते झेलण्यासाठी तुझे विचार मला देत होते मनोबळ..
हा माझा तुझ्या प्रेमासाठीचा छोटासा प्रयास...
मग करूया का आपण एकत्र जीवनाचा प्रवास...
✍️an🙏
- Amol m nannaware 
पहिल्यांदा पाहिलं तुला मनाला कंपने भासली...
परत पहिले तेव्हा थेट काळजातच घुसलीस ....
तू गोरीपान रूप तुझे छान मनाला हुरहूर लागली..
काळे तुझे केस आणि ओठ तुझे लाल..
माहिती नाही का? पन हवीहवीशी वाटलीस ...
तुझ्या त्या हश्याने शेकडो काळीज तुटली..
नयनांनी बोललो तुला तू माझीच वाटली...
इतकी सुंदर आणि गोड आहेस तू कि..
माझ्यासारख्या अरसीकाला सुद्धा  कविता सुचली..
✍️an🙏
- amol m nannaware 
एकटा बसलो असताना आठवण तुझी सतावते..
अनेकदा विचार केल पन तूच मनाला भावते..
मन माझे अल्लड कायम तुझ्याकडेच धावते..
तुझी स्वप्न पाहण्यासाठी पापणी ही स्वतःहून लवते..
भवनाच्या खोल डोहात मन हे माझे पोहते....
मग येता तू समोर माझ्या वृद्वयाची धडकन वाढते..
तव प्रेमाच्या उष्णतेने गोठलेले मनही द्रवते..
कळत नाही आपल्यामध्ये नाते नक्की कोणते..
तू नसली जवळ तरी आठवण अस्तित्व दावते..
✍️an🙏
- amol m nannaware 

Thursday, May 14, 2020

जिंकता येते सहज जगाला
आधी मन जिंकता आले पाहिजे
मार्ग नक्कीच काढता येतो
आपल्याला पुढे जाता आले पाहिजे
विसरता नक्की येते दू:खाला
विसरून स्वताचे जगाकडे
पाहता आले पाहिजे
दू:खात ही सुख नक्की भेटते
इतरांचे दुःख ही जानता
आले पाहिजे
नक्कीच तिरस्कार करावा पापाचा
आपल्याला पुण्यवान होता
आले पाहिजे
दुसर्याला समजावने खुप सोप्पे
आपल्याला स्वताला तसे
जगता आले पाहिज..
✍️an🙏
- amol m nannaware 
खास तुझ्यासाठी...
देवच जाणे काय वाटतं माझ्या मनाला मला काहीच कळत नाही...
कारण..
खरं तर माझं हे वेड मन तुझ्या आठवणी शिवाय कुठंच लागत नाही...
काय विचार चालतात माझ्या मनात काहीही समजतं नाही...
तुझ्याशिवाय खरंच मला अजिबात करमत नाही..
कारण..
तुझ्याशिवाय हे बावरे मन दुसरे काहीच मांगत नाही.. त्याला फक्त हवा  असते तू आणि तू कारण..
तुझ्यावर किती आहे माझं प्रेम हे मला शब्दात मांडता येणार नाही...
 ✍️an🙏
- amol m nannaware 
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणी तरी तासन तास आपलाच विचार करणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
... कुणीतरी आपला विचार करत पापनी वर पापनी अलगत टेकवनं.
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
काळजात साठवनं ,
कुणाला तरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
देवा समोर ही स्वता आधी आपलं सुख मागणं...
✍️an🙏
- amol m nannaware 
कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या
आहारी जात नाहीत , आणि
नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होउ शकत नाही .....""
 नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी
 व्हा !
यश तुमची वाट पाहात आहे..
✍️an🙏
- amol m nannaware 
खुप खुप ताकद लागते आलेलं अपयश पचवायला,
डोळयात आलेलं पाणी पुसून ओठावर हसू खेळवायला,
काहितरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्यात जगायला
शेवटी अपयशाचीच गरज असते मन खंबीर बनवायला...
✍️an🙏
- amol m nannaware 
धाव धाव धावतो आहे,दिशा मात्र कळत नाही.
ह्रदयाचे पाऊल कधी,ह्रदयाकडे वळत नाही.
इतकं जगून झालं पण, जगायला वेळ नाही.
जगतो आहोत कशासाठी, कशालाच कशाचा मेळ नाही.
क्षण एक येईल असा,घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावरच थांबलेला, असेल जीवन प्रवास.
अजूनही वेळ आहे,थोडं तरी जगून घ्या.
सुंदर अशा जगण्याला, डोळे भरून बघून घ्या.
✍️an🙏
- amol m nannaware 
एकदा OLX वर Ego विकून पहा... जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो..
✍️an🙏
- amol m nannaware 
मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.. फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं आठवडयातून ऊगवणार... मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा.. अंगावर घ्यावा असा राघवशेला एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात नेहमीकरता असणारी तुमची साथ..... सोबत रहा तूम्ही  फक्त.. इतकंचं एक मागणं आहे... तूम्ही असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे...
❣️माझ्या लाडक्या मित्रांना समर्पित ❣️
✍️an🙏
- amol m nannaware 
नेहमी आपल्या वास्तविक रूपात रहा
स्वतःला व्यक्त करा स्वतः मध्ये विश्वास ठेवा
बाहेर जावून कुठल्या तरी यशस्वी व्यक्तीला शोधू नका
आणि त्यांची नक्कलही करू नका कारण तुम्हीही
यशस्वी होणार आहात यावर कायम विश्वास ठेवा..
✍️an🙏
- amol m nannaware 
वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरते...... जीवनात तुम्हाला
जर पडायचे नसेल तर स्वत: चा विस्तार वाढवते वेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवा...
आयुष्यात कधीच पडणार नाही...
✍️an🙏
- amol m nannaware 
आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत.
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.
फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुले ही सर्वांसाठी असतात
आणि सर्वांना सारखाच सुगंध देतात..
✍️an🙏
- amol m nannaware 
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी...
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी..
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी...
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी...
कितीतरी उत्तरे अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवतांना... कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरतांना...
✍️an🙏
- amol m nannaware 
... संपूर्ण जग सुंदर आहे,
फक्त तसं पहायला हवं.
... प्रत्येक नातं जवळचं आहे,
फक्त ते उमजायला हवं.
... प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,
फक्त तसं समजायला हवं.
... प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे,
फक्त तसं जगायला हवं.
✍️an🙏
- amol m nannaware 
माझ्या मते खरा सेल्फी........!
दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ?
कुणावर ओरडलो ?
कुणाकुणाला आनंद दिला ?
कुणाच्या चेह-यावर हसू आणले ?
काय नको तसे वागलो,
काय हवे तसे वागलो,
वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी. . . !!
रात्री या सर्वांचा विचार करायचा, जे जे आज चुकले ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा...  चेहर्याच्या सेल्फीपेक्षा अंतरंगाचा सेल्फी  अधिक महत्वाचा असतो जीवनात..
✍️an🙏
- amol m nannaware 
काही मिळवण्यापेक्षा काही हरवण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कवीता,
खरंच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजा वेगळीच असते...
✍️an🙏
- amol m nannaware 
""मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला..... मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????" ,.मेणबत्ती म्हणाली: " ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना.. तेव्हा अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले असते..
✍️an🙏
-Amol m nannaware 
जेव्हा मन कमकुवत असतं,
तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते,
जेव्हा मन संतुलित असतं,
तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते,
जेव्हा मन मजबूत असतं,
तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते,
म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल,
तर परिस्थितीवर निश्चित विजय मिळवता येतो.
✍️an🙏
- amol m nannaware 
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांणा उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो...
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे चारित्र्य आणि माणुसकी.....
ज्याच्यात असेल तोच खरा श्रीमंत...
✍️an🙏
-Amol m nannaware 
केवडयाला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.....
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं....
पाहिलं तर दिसत नाही ,पण नसलं तर जेवणच् जात नाही...!
✍️an🙏
- amol m nannaware 
जिंकता येते सहज जगाला आधी मन जिंकता आले पाहिजे....
मार्ग नक्कीच काढता येतो आपल्याला पुढे जाता आले पाहिजे...
विसरता नक्की येते दू:खाला फक्त स्वतःच्या नजरेने जगाकडे पाहता आले पाहिजे...
दू:खात ही सुख नक्की भेटते इतरांचे दुःख ही जानता आले पाहिजे...
नक्कीच तिरस्कार करावा पापाचा
आपल्याला पुण्यवान होता आले पाहिजे...
दुसर्याला समजावने खुप सोप्पे
आपल्याला स्वताला तसे जगता आले पाहिजे...
✍️an🙏
- amol m nannaware 
आयुष्यात खुप माणसे भेटतात… वा-याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात… पण काही अशी असतात, जी मनात जागा घेतात… हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात… ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात तर कधी कधी अश्रू ही देऊन जातात....
✍️an🙏
- Amol M Nannaware 
वेळेची पण एक वेगळीच
खासियत आहे..
हसणाऱ्याला कधी रडवेल,
आणि रडणाऱ्याला कधी हसवेल
सांगता येत नाही..!
✍️an🙏
-Amol M nannaware 
*जगातील एकच*
      *गोष्ट माणसाला*
*यशस्वी होऊ देत नाही*
      *ती म्हणजे*
*स्वतःच्या मनातील भीती *
✍️an🙏
Amol M Nannaware
संकट छोटे असो वा मोठे ,कुणालाच नको असते. मात्र अशा संकटामधूनही जे काही धडे घेतात,तेच ख-या अर्थाने आयुष्यात यशस्वी
होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते...!!!!
✍️an🙏
Amol M Nannaware 
""प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत,
 कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे.
 जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतुचा प्रामाणिकपणा सिध्द होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात".
✍️an🙏

प्रेम म्हणजे काय असत?

कुणीतरी सांगितलं होत....प्रेम फार गोड असत ..
पण मला अजूनही नाही समजल हे प्रेम काय असत..?
नेहमी तिच्या बद्दल विचार करण म्हणजे प्रेम
कि प्रत्येक विचारात ती असण प्रेम असत...??
ती बरोबर असावी अस वाटण प्रेम असत
कि ती दूर असूनही जवळ भासण प्रेम असत...??
मला अजूनही नाही समझल हे प्रेम काय असत..??
तिच्या दुखात तिच्याबरोबर असण प्रेम असत
कि तिच्या सुखा साठी तिच्या पासून दूर जाने प्रेम असत...??
मला अजूनही नाही समझल कि हे प्रेम काय असत ???
आपल्या सुखासाठी कोणाचा विचार न करण प्रेम असत ..
कि दुसऱ्यांच्या सुखासाठी एकमेकांचा त्याग करणे म्हणजे प्रेम असत ...?
मला अजूनही नाही समजल........
प्रेम म्हणजे काय असत ..
प्रेम म्हणजे काय असत...!!
✍️an🙏
जगाला काय आवडतं ते नका करु,
 तुम्हाला जे वाटतं ते करा,
उदया तुमच वाटणं जगाची आवड बनेल. .!!!
✍️an🙏


जात्याचा खालचा दगड स्थिर असतो. वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होते आणि आयुष्य अगदी या खुल्या वातावरणाप्रमाणे भासते. 
✍️an🙏
देवाची मूर्ती विकत घेताना
रुपयांचा भाव करतात
आणि नंतर घरात आणल्यावर
त्याच मूर्तीकडे कित्येक कोटी
मागतात , हा वेडेपणाही दाद
देण्यासारखा आहे ,
अंधार मनात असतो आणि
दिवे देवळात लावतात...🤔
✍️an🙏
चांगला ""गुरू" तुमच्यासाठी यशाचे ‬
दरवाजे उघडून देऊ शकतो..,
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला स्वतःलाच चालावे लागते...
कोणीही फक्त रस्ता दाखवू शकतो पन प्रत्यक्षात त्या रस्त्यावर आपल्यालाच चालायचे असते..
✍️an🙏

मतलबी दुनिया

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर...
तासभर साथ देणारी माणसं
बस मध्ये पण भेटतात.।।
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात...
✍️an🙏

जीवनाचा अर्थ

एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंगन  , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मला वाटते कदाचित मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच...
✍️an🙏

आत्मविश्वास

""कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहु नका.
जबाबदारीने धाडसाने पाऊल उचलायला मागेपुढे पाहु नका.
आपल्या स्वतःच्या निर्णयाला परिश्रमाची साथ द्यायला कधी विसरू नका,
आत्मविश्वासाने सर्वकाही कमवता येते. अपयशाने मात्र कधीच खचुन जाऊ नका.
 ........... "मान-सन्मान त्यांचाच करा......,
 जे तुम्हाला बरोबरीने सोबत
 घेऊन चालतील.......!!!!
✍️an🙏

Friend forever

अनोळखी चेहरे कधी कधी ओळखीचे होऊन जातात कळतच नाही... हळू हळू भाव मैत्रीचे गुंततात आणि आपण त्यात गुंतत जातो...आणि त्याच मैत्रीवर तुझ्यासाठी ...