Thursday, May 14, 2020

माझ्या मते खरा सेल्फी........!
दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ?
कुणावर ओरडलो ?
कुणाकुणाला आनंद दिला ?
कुणाच्या चेह-यावर हसू आणले ?
काय नको तसे वागलो,
काय हवे तसे वागलो,
वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी. . . !!
रात्री या सर्वांचा विचार करायचा, जे जे आज चुकले ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा...  चेहर्याच्या सेल्फीपेक्षा अंतरंगाचा सेल्फी  अधिक महत्वाचा असतो जीवनात..
✍️an🙏
- amol m nannaware 

No comments:

Post a Comment

Friend forever

अनोळखी चेहरे कधी कधी ओळखीचे होऊन जातात कळतच नाही... हळू हळू भाव मैत्रीचे गुंततात आणि आपण त्यात गुंतत जातो...आणि त्याच मैत्रीवर तुझ्यासाठी ...