Thursday, May 14, 2020

मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.. फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं आठवडयातून ऊगवणार... मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा.. अंगावर घ्यावा असा राघवशेला एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात नेहमीकरता असणारी तुमची साथ..... सोबत रहा तूम्ही  फक्त.. इतकंचं एक मागणं आहे... तूम्ही असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे...
❣️माझ्या लाडक्या मित्रांना समर्पित ❣️
✍️an🙏
- amol m nannaware 

No comments:

Post a Comment

Friend forever

अनोळखी चेहरे कधी कधी ओळखीचे होऊन जातात कळतच नाही... हळू हळू भाव मैत्रीचे गुंततात आणि आपण त्यात गुंतत जातो...आणि त्याच मैत्रीवर तुझ्यासाठी ...